ग्रामपंचायत भायगव्हाण

ग्रामपंचायत भायगव्हाण

ता.घनसावंगी जि.जालना

upkram

ग्रामपंचायत भायगव्हाण • ता. घनसावंगी • जि. जालना

स्वच्छ • सुरक्षित • समृद्ध भायगव्हाण

ग्रामपंचायत स्थापना दिनांक 01 मे 1962. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे भायगव्हाण गाव सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

लोकसंख्या (2021) 1,736
कुटुंब संख्या 382
मतदार संख्या 973
महिला बचत गट 17

🏡 गावाची ओळख

  • जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 55 कि.मी. अंतर
  • शेती हा प्रमुख व्यवसाय
  • 3 सार्वजनिक विहिरी
  • 1 जिल्हा परिषद शाळा व 2 अंगणवाडी
  • पिन कोड – 431209

🚰 पाणी व स्वच्छता

  • जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी
  • ओला-सुका कचरा वर्गीकरण सुविधा
  • घंटागाडी व घनकचरा व्यवस्थापन
  • भूमिगत गटार व्यवस्था
  • RO शेड बांधकाम

🌳 पर्यावरण व जलसंवर्धन

  • वृक्षलागवड व संवर्धन उपक्रम
  • जलयुक्त शिवार अभियान
  • लोकसहभागातून गाळ उपसा
  • पाणी सप्ताह व जलसंवाद उपक्रम

🏗️ विकास कामे

  • नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम सुरू
  • CCTV सुरक्षा व्यवस्था
  • भायगव्हाण-राहेरा रस्ता मजबुतीकरण
  • शाळेची रंगरंगोटी
  • सार्वजनिक बसण्याची सुविधा

🛕 धार्मिक व सांस्कृतिक वारसा

हनुमान जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह
दरवर्षी मोठ्या उत्साहात सप्ताहाचे आयोजन केले जाते. सामूहिक पंगत, नवसाच्या गाड्या ओढणे व यात्रा भरविणे यामुळे गावात सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते.
प्रमुख मंदिरे
हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व महादेव मंदिर ही गावाची प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.

📧 संपर्क : gpbhaygavhan@gmail.com
“सर्वांच्या सहभागातून आदर्श ग्रामपंचायत घडविणे हेच आमचे ध्येय.”